लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर्चा झाली. आॅगस्ट अखेरपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.स्वच्छतागृहांची संख्या आणि स्थिती, इयत्ता पहिली ते पाचवीचे शिक्षण पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या गावातच देता येईल का? तसेच इयत्ता सहावी ते आठवीबाबत संपूर्ण अनिवासी शाळा चालवणे शक्य आहे का, याचाही विचार करावा. इयत्ता नववी ते बारावीचे निवासी वर्ग सुरू करणे शक्य असून, त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले.सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना शाळेवर पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. त्याचप्रमाणे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, पाण्याची आणि निवासाची क्षमता, व्यवस्था तपासून पाहणे आवश्यक असल्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत आश्रमशाळा सुरु करणे शक्य नाही, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली. बैठकीचे नियोजन मंत्र्यांचे सचिव कैलास देवरे यांनी केले होते. सदर बैठकीस कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्र म गायकवाड, महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष राऊत,कार्याध्यक्ष सुभाष बावा आणि सरचिटणीस संजय जाधव उपस्थित होते.उपाययोजना करण्याची गरजकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आदिवासी आश्रमशाळा तत्काळ सुरु करणे शक्य नसून, त्याबाबत कर्मचारी संघटनेने आदिवासी विकासमंत्री पाडवी यांच्याकडे दि. १५ जून रोजी प्रस्ताव सादर केला होता.
आश्रमशाळा सुरू करण्याबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 7:25 PM
येवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर्चा झाली. आॅगस्ट अखेरपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ठळक मुद्देयेवला : पाडवी यांची कर्मचारी संघटनेसमवेत बैठक