अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघासमवेत विश्रामगृहावर बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत साजिद निसार अहमद, संचालक सुनील चौहान, अधिकारी फ्रेक्सी चौहान, उपसंचालक राजेश शिरसागर, राईस अहमद, फैज अहमद, मोहम्मद सिद्दीक उपस्थित होते. दि. २७ जानेवारी रोजी पुण्याहून पथक मालेगाव येथे शाळांची पाहणी करण्यासाठी आले होते. साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिष्यवृत्तीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संचालक चौहान यांची भेट घेतली. राज्यभरातील शाळांना भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिष्यवृत्तीची कागदपत्रे तपासण्यासाठी फक्त पालकांचे स्वयंघोषित वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र स्वीकारावे व तहसीलदार व सक्षम अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राबाबत सक्ती करू नये. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अपलोड केलेले फॉर्म मंजूर झाले पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी शून्य बॅलन्सवर खाते उघडणे आणि दोन वर्षांसाठी व्यवहार न केल्यास पालक व विद्यार्थ्यांची बँक खाती बंद ठेवू नयेत, या साठी कार्यालय स्तरावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत्रव्यवहार करण्यात यावा. मुख्याध्यापक लॉगिंगवर पडताळणी केलेले अर्ज पुन्हा पडताळणीसाठी आले आहेत. अंतिम मुदत खूपच कमी देण्यात आली आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाईल, असे चौहान यांनी आश्वासन दिले.
शिक्षण संचालकांशी उर्दू शिक्षक संघटनेची विविध प्रश्नांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:48 AM