वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.मागील वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणजेच भात सोंगणीचा हंगाम संपल्यानंतरही परतीचा अवकाळी पाऊस बरसतच होता. मागील वर्षीच्या सुरुवातीलाही भातरोपांची दुबार पेरणी करावी लागली होती. अतिवृष्टीचे प्रमाण इतके होते की, शेतात लावणी केलेले भातपीक अक्षरश: वाहून गेले. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेले भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र ऐन निसवण्याच्या कालावधीपासूनच भातावर करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांनी आक्र मण केले व त्यातून भातपिकाची मोठी नासाडी झाली होती. २००९ मध्ये बिगरमोसमी पावसाने १७ हजार ३४३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक नुकसान भाताचेच होते. २०१० मध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यात एकूण दहा हजार ८६३.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सर्वाधिक नऊ हजार ८६१.७६ हेक्टर इतके भाताचे क्षेत्र होते, तर २०११ मध्ये करपा रोगाने चार हजार हेक्टर भातपिकाचेच नुकसान झाले होते. याहीवर्षी वेळेत पाऊस न झाल्याने भातपिकांचे रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी करून, कोरोनाच्या महामारीत दुप्पट लागवड खर्च करून भातपिकांची लागवड केली. आता ऐन निसवण्याच्या मोसमातच करपा, मावा, तुडतुडे या रोगांसह भेसळयुक्त बियाणं यामुळे भाताचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांनी याची दखल घेत शासनाने रोगराईला बळी पडलेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमे मंजूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महागडे बियाणे, खते, लागवड खर्च व मेहनत करूनही भातपिकावर गंडांतर येत आहे. शासनाने रोगाला बळी पडलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन रोगाला बळी पडलेल्या भातपिकांची विमा कंपन्यांनीही दखल घेत पिकविमे मंजूर करावे.- विठोबा दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य.