सिन्नर : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसटी बसचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी आगारातील ५० बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी व्यक्त केली जात असून, अनेक उद्योग-व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. हा आजार संपर्कातून होत असल्याने खासगी व सार्वजनिक वाहतुकीला त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मात्र, आता बॅक्टी बॅरिअर इंडियाअंतर्गत ॲन्टिमायक्रोबायल ट्रीटमेंटमार्फत एसटी बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या ट्रीटमेंटमुळे एसटी बसमधून प्रवास करताना किमान दोन महिने कोरोनापासून प्रवाशांचा बचाव होणार असल्याची माहिती आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली. संगमनेर आगारातील सुमारे ५० बसचे या पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे समन्वयक अमर भावसार यांनी दिली. एसटी महामंडळाने बॅक्टी बॅरिअर कंपनीशी करार करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विषाणूरोधक कोटिंग करून या बस निर्जंतुकीकरण केले जात आहे. या लिक्विडला इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सीलॉजी रिसर्च अँड हापकिंग लॅब यांची मान्यता आहे. या विषाणूरोधक कोटिंगमुळे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस नष्ट होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या बसेस सुमारे दोन महिने विषाणूमुक्त राहतात. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून ही खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------
सिन्नर आगारातील बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले त्याप्रसंगी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी व कर्मचारी. (११ सिन्नर बस)
110921\11nsk_35_11092021_13.jpg
११ सिन्नर बस