नाशिक- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टखाली कलम 88 आणि 83 अंतर्गत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. आजी-माजी अध्यक्षांसह एकूण 17 जणांवर दोषारोप आहेत. जॉईंट रजिस्टर भालेराव यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मागच्या काही महिन्यांपासून घोटाळयांमुळे संचालक मंडळावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
नाशिक जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:20 AM