लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तुरुंगात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खर्च करण्यासह विविध कारणांवरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार खात्याने बरखास्तीची नोटीस बजावली आहे. येत्या १८ तारखेपर्यंत यासंदर्भात खुलासा करण्यास बजावण्यात आले आहे.गेल्यावर्षी नोटबंदी होण्याच्या अगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचवटीत एका मोटारीतून ५५ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी ही रक्कम नेत होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ही रक्कम माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या घरी नेली जात नसल्याचे आढळले होते. असे असले तरी संबंधित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले होते. सदर कर्मचाऱ्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यासाठी खर्च तसेच आर्थिक अनियमितता आढळून आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आणि तुरुंगात असलेल्या या कर्मचाऱ्यांवर बाजार समितीने खर्च केला होता. यांसह आर्थिक अनियमिततेच्या सुमारे अठरा मुद्द्यांवरून ही नोटीस बजावण्यात आली. समितीला १८ जूनपर्यंत नोटिसीला उत्तर द्यावे लागणार असून, १९ तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बाजार समितीला बरखास्तीची नोटीस
By admin | Published: June 05, 2017 1:23 AM