शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

न पाठविलेला ठराव विखंडणाचा आग्रह

By admin | Published: December 14, 2015 11:53 PM

स्मार्ट सिटी : सत्ताधाऱ्यांनी उडविली भाजपाची खिल्ली

नाशिक : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘एसपीव्ही’वगळून महापालिकेने ठराव प्रशासनाला पाठविल्याने तो विखंडित करण्याचा आग्रह स्थानिक भाजपा आमदारांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे धरला; परंतु अद्याप कोणताही ठराव प्रशासनाला पाठविला गेलाच नसल्याने तो विखंडणासाठी आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांची खिल्ली सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांनी उडविली. दरम्यान, महापालिकेने सायंकाळी अटीशर्ती टाकून ठराव प्रशासनाला पाठविल्याने भाजपा आमदारांचे ठराव विखंडणाचे प्रयत्न व्यर्थ ठरले. स्मार्ट सिटीअंतर्गत ‘एसपीव्ही’ वगळून महापौरांनी महासभेचा ठराव शुक्रवारीच प्रशासनाला पाठविला होता. त्याला नगरसचिव विभागाने दुजोराही दिला होता. त्यानुसार, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने भाजपाचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, राहुल अहेर आणि अपूर्व हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कलम ४५१ अन्वये सदरचा ठराव विखंडित करून एसपीव्हीसह स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा आग्रह धरला. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. महापालिकेची महासभा ही सार्वभौम असते आणि तिचे अधिकार राज्य अथवा केंद्र सरकार हिरावून घेऊ शकत नाही. महासभेत केवळ दोन सदस्यांनीच चुकीच्या माहितीच्या आधारे विरोध दर्शविला होता, तर अन्य सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शवित स्मार्ट सिटीचे समर्थन केले आहे. परंतु पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांनी निर्णय देताना बहुमताचा कौल लक्षात न घेता दोन सदस्यांच्या विरोधाच्या आधारावर कौल देत जनमताचा अनादर केला आहे. त्यामुळे सदर ठराव विखंडित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भाजपा आमदारांनी म्हटले आहे, परंतु सदर ठराव प्रशासनाला अद्याप रवानाच झाला नसताना त्याच्या विखंडणाचा आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांच्या भूमिकेची सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खिल्ली उडविली. भाजपा आमदारांना प्रसिद्धीची अतिघाई झाल्याचाही टोला एका पदाधिकाऱ्याने लगावला.