शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

  मंजुरी मिळूनही बांधकाम होत नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 5:51 PM

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.आमदार छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात असलेल्या या ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी कामे शासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रखडली. त्याची माहिती समजताच या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सूचना दिल्याचे समजते.लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मुबलक जागा पाहता परिसरात पोस्टमार्टेम रूम तसेच वैद्यकीय अधिकारी व चतुर्थ श्रेणी कामगार यांचे निवासस्थान बांधकाम करण्यास मुबलक जागा आहे. याबरोबरच लासलगाव येथील नळ पाणी योजनेचे पाणी साठविण्यासाठी जलकुंभ या विविध बांधकामे करण्यासाठी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने किमान दीड डझन पत्रे पाठविली गेली.या रुग्णालयाच्या परिसरात सुंदर बाग तयार करण्यात आली आहे तसेच बगीच्यात लहान मुलांना खेळायला खेळणीदेखील आहेत.येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.व्ही. सूर्यवंशी यांच्यासह सहकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना तपासून आंतररुग्ण सेवाही दिली जाते. लासलगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर एकांतात हे रुग्णालय असले तरी आकस्मिक मृत्यू तसेच अपघात व दुर्घटना घडली तर पोलीस सोपस्कारानंतर लासलगाव परिसरातील मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. तातडीने शवविच्छेदन केंद्र काम होण्याची गरज आहे.लासलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर हे रु ग्णालय असून, दहा ते अकरा शिपाई व इतर कर्मचारी, एक वैद्यकीय अधिकारी, सहायक अधिकारी निवास स्थान, कार्यालय अधिकारी यांची निवासस्थाने या बांधकामाची निकड आहे. या रुग्णालयात कर्मचारी यांच्या पदाची मंजुरी असून, फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे, तसेच एमएसईबी पॅनल जळालेले आहे.............लासलगाव परिसरात मृतदेहाचे पोस्टमार्टेम रूम होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु शासकीय अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे?- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर (२३लासलगावहोळकर)