नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात पाच ते सहा पट करवाढ केल्याचे पडसाद उमटू लागले असून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपालाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने भाजपात अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान, आयुक्तांनी घेतलेल्या या करवाढीच्या निर्णयाबद्दल असहमती दर्शवित महापौर रंजना भानसी आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. महापालिका आयुक्तांनी नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकतींसह १ एप्रिल २०१८ पासून नव्याने निर्माण होणाऱ्या इमारती तसेच जमिनींवर करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात ५ ते १३ टक्के इतकी वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून करण्याचे आदेशही त्यांनी काढले आहेत. आयुक्तांच्या घेतलेल्या या करवाढीच्या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी याबाबत थेट भाजपालाच लक्ष्य केले आहे. या करवाढीच्या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपातही कमालीची अस्वस्थता पसरली आहे. सायंकाळी भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, पत्रकारांनी भांडारी यांना या करवाढीच्या निर्णयासह मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या आयुक्तांच्या विविध निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित केला असता भांडारी यांनी याबाबत स्थानिक पदाधिकाºयांनीच भाष्य करणे योग्य राहील, असे स्पष्ट केले. त्यानंतर, महापौर रंजना भानसी यांनी भूमिका स्पष्ट केली. महापौरांनी सांगितले, दर व कर ठरविण्याचे अधिकार हे महासभेला आहेत. आयुक्तांनी ३३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव महासभेवर पाठविला त्यावेळी नागरी हित लक्षात घेऊन त्यात कपात करण्यात आली व त्यानुसार १८ टक्क्याने अंमलबजावणी सुरू केली. आता करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे शहरात करवाढीच्या निर्णयाच्या वेगवेगळ्या स्तरावर प्रतिक्रिया उमटत असताना आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र, याप्रकरणी मौन बाळगणे पसंत केले. वसंतस्मृती कार्यालयात माधव भांडारी यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी पत्रकारांनी भांडारीयांना या प्रश्नी छेडले असता, त्यांनी स्थानिक पदाधिकाºयांकडे बोट केले. महापौर भानसी आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पत्रकारांनी आमदार सीमा हिरे यांनाही विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता हिरे यांनी पत्रकारांना टाळून तेथून जाणे पसंत केले. त्यानंतर, मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद साधून सदर करवाढ ही अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे सांगत त्यात कपात करण्यासाठी शासनालाविनंतीकरणारअसल्याचेसांगितले.
आयुक्तांच्या निर्णयाशी असहमत : मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार; पत्रकार परिषदेत माहिती करवाढीमुळे भाजपात अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:13 AM
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात पाच ते सहा पट करवाढ केल्याचे पडसाद उमटू लागले.
ठळक मुद्देनिर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहेसत्ताधारी भाजपातही कमालीची अस्वस्थता पसरली