सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात उपसरपंचासह आठ सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी (दि. २४) झालेल्या विशेष सभेत ८ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला.तहसीलदार नितीन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा पार पडली. जयसिंग नागरे यांच्यासह आठ सदस्यांनी १९ आॅक्टोबर रोजी सरपंच सानप यांच्या विरोधात तहसील-दारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर विचार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नागरे यांनी अविश्वास ठराव मांडला, तर संजय मुरलीधर सानप यांनी त्यास अनुमोदन दिले. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, सन्मानपूर्वक वागणूक देत नाहीत, गावाच्या विकासकामात लक्ष नाही, पूर्वसूचना न देता परस्पर कधीही बैठक घेतात, असे आरोप बैठकीत करण्यात आले. गेल्या साडेतीन वर्षांत गावाच्या विकासाचे एकही भरीव काम झाले नाही. ग्रामसभा, मासिक सभा नियोजित पद्धतीने होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिला सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.मी ११ तारखेपासून रजेवर आहे. उपसरपंचांकडे प्रभारी सरपंच म्हणून कारभार सोपविला होता. सर्व सदस्यांंची भूमिका संशयास्पद आहे. या विरोधात अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले आहे.- बाळासाहेब सानप,माजी सरपंच
निमगाव सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:37 PM
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात उपसरपंचासह आठ सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी (दि. २४) झालेल्या विशेष सभेत ८ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला.
ठळक मुद्देसर्व सदस्यांंची भूमिका संशयास्पद आहे.