शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

दोघा महिलांना अटक: निराश्रीत अल्पवयीन मुलीला ढकलले देहविक्रयच्या व्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 7:39 PM

नाशिक : शहर व परिसरात विनयभंग, बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पंचशीलनगर येथील काही महिला व ...

ठळक मुद्देवर्षभरानंतर मुलीने करून घेतली सुटकापिडितेचा ठरला होता ‘सौदा’नराधमांचा शोध सुरू

नाशिक : शहर व परिसरात विनयभंग, बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पंचशीलनगर येथील काही महिला व पुरूषांनी मिळून पिडित एका अल्पवयीन निराश्रीत मुलीला फूस लावून जेवणात गुंगीचे औषध देवून तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तीच्याकडून देहविक्रयचा व्यवसायदेखील करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका अल्पवयीन निराश्रित मुलीच्या मजबुरीचा गैरफायदा घेत गंजमाळ पंचशीलनगरमधील मुख्य संशयित आरोपी आलिशा उर्फ सुलताना व सज्जो या दोघींनी तिला आमच्या मुलीप्रमाणे सांभाळू असे सांगून आधार देण्याचा प्रयत्न केला. १ सप्टेंबर२०१९ पासून तर थेट १जुलै २०२० या कालावधीत तिच्याकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय करून घेत पैसेदेखील कमविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडित मुलीने या दोघी महिलांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत थेट भद्रकाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तिच्यासोबत झालेला अन्याय व अत्याचाराचा प्रसंगाने पोलिसांनाही हादरवले. दोघी संशयित महिलांनी पिडित मुलीला गुंगीचे औषध जेवणातून देत संशयित गणेश, आकडेवाडा, जयेश जाधव यांच्यामार्फत तिच्यावर बलात्कार घडवून आणला आणि मोबाईलद्वारे चित्रीकरण करत त्यानुसार पिडित मुलीला वारंवार धमकावून ठेवल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर हे तीघे नराधम फरार झाले आहेत. या तीघांनी तिला वेगवेगळ्या दिवशी भिन्न भिन्न ठिकाणी घेऊन जात बळजबरीने शारिरिक संबध निर्माण करत लैंगित अत्याचार केला. तसेच या नराधमांकडून पैसे उकळल्यानंतर आलिशा ऊर्फ सुलताना हिने तीच्या मैत्रिणी सज्जो, शब्बो व मनिषा (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्याकडे देहविक्रय करण्यासाठी बळजबरीने पाठवून दिले. त्यामुळे या महिलांनीसुध्दा वेगवेगळ्या अनोळखी पुरूषांसोबत तिला बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दोघी महिला ताब्यात; नराधमांचा शोध सुरूपोलिसांनी दोघा महिलांना अटक केली असून उर्वरित सर्व संशयितांचा शोध घेत आहे. पिडितेच्या फिर्यादीनुसार सर्व संशयित महिलांसह पुरूषांवर बलात्कार, पोक्सो, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाव व पत्ता अर्धवट असल्यामुळे उर्वतिर संशयितांचा माग काढणे अवघड होत आहे; मात्र लवकरच सर्वांना बेड्या ठोकणार असल्याचा आशावाद तपासी अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाArrestअटक