नाशिक : भारतीय स्वातंत्र्यलढा, राज्यघटनेची निर्मिती यामध्ये वकिलांचे मोठे योगदान असून, आजही संसद सदस्यांमध्ये कायद्याचे शिक्षण घेतलेल्या खासदारांची संख्या अधिक आहे़ वकिलांकडे समाज एका वेगळ्या दृष्टिकोनातून व अपेक्षेने पाहत असतो़ त्यामुळे वकिलांनीही केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारी व प्रतिमा जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्र शासनाचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले़ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुना गंगापूर नाक्याजवळील चोपडा बॅन्क्वेट हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय कायदेशीर चर्चासत्र या कार्यक्रमात ‘प्रोफेशनल राईट अॅण्ड रिस्पॉन्सबिलिटी आॅफ अॅडव्होकेट््स अॅण्ड रिसेण्ट लॉ’ या विषयावरील तज्ज्ञांच्या चर्चासत्रानंतर ते बोलत होते़ सिंग पुढे म्हणाले की, वकील व डॉक्टर या दोन घटकांकडे समाज मार्गदर्शक म्हणून पाहतो़ त्यामुळे व्यवसायाबरोबरच समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीही वकिलांची असल्याचे सिंग यांनी सांगितले़या चर्चासत्रात सहभागी झालेले अॅड़ राजीव पाटील, अॅड़ श्रीधर माने, अॅड़ एऩ जी़ गायकवाड, अॅड़ एम़ वाय. काळे, अॅड़ विठ्ठल कोंडे - देशमुख यांनीही या विषयावर आपली मते मांडली़ त्यामध्ये वकिलांवर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांमुळे वकिलांच्या प्रतिमेस धक्का पोहोचत असल्याचे सांगितले़ त्यामुळे वकिलांनी ओळख देताना, नोटरी करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ डॉक्टरांप्रमाणेच वकिलांनाही संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही या चर्चेतून समोर आली़या कायदेविषयक चर्चासत्राचे उद्घाटन कोपरगावचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए़ पी़ रघुवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले़ यानंतर ‘कॉन्ट्राडिक्शन अॅण्ड ओमिशन’ या विषयावर न्यायाधीश रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले़ दुपारच्या सत्रात ‘स्कील्स अॅण्ड ड्राफ्टिंग अॅण्ड अर्ग्युर्इंग बेल मॅटर्स’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये अॅड़ गजानन चव्हाण, अॅड़ मिलिंद थोबाडे, अॅड़ बळवंत जाधव, अॅड़ अविनाश भिडे यांचा समावेश होता़ यानंतर ‘इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स अॅण्ड रिक्वायमेंट आॅफ प्रुफ’ या विषयावर चर्चासत्रात अॅड़ बी़ के़ गांधी यांनी मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)
सामाजिक प्रतिमा जपावी
By admin | Published: November 28, 2015 10:52 PM