शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

जिल्ह्यातील चार हजार प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:31 AM

राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार आज जिल्हाभरात लोकअदालतींचे नियोजन करण्यात आले होते. वाघवसे यांच्या हस्ते या लोकअदालतीचा शुभारंभ ...

राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार आज जिल्हाभरात लोकअदालतींचे नियोजन करण्यात आले होते. वाघवसे यांच्या हस्ते या लोकअदालतीचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. दिवसभर विविध न्यायालयांमध्ये कोविड- १९ बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून लोकअदालत पार पडली. या लोकअदालतीत जिल्हाभरातील प्रलंबित प्रकरणांपैकी ७ हजार ३१० प्रकरणे ठेवण्यात आली होती. दावा पूर्व दाखल प्रकरणांमधील २० हजार २४६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. कलम १३८ ची ९२६, फौजदारी ३८७, बँकेची ७१, मोटार अपघाताची १४७, कामगारविषयक ४, कौटुंबिक वादाची ८८, भूसंपादनाची ६ व दिवाणी १०१ अशी १ हजार ७३० प्रकरणे यात निकाली निघाली. तसेच दावा दाखल पूर्व २ हजार २१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशा प्रकारे एकूण ३ हजार ९४४ प्रकरणांचा निपटारा झाला. एकूण २५ कोटी ८९ लाख ७० हजार २९७ रुपयांच्या रकमेची तडजोड होऊन रक्कम वसूल करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी लोकअदालतीत सहभागी सर्व न्यायाधीश, अधिकारी, वकील व पक्षकारांचे आभार मानले.