पेठ : तालुक्यातील एकदरे येथील रेशन दुकानातुन दिंडोरी तालुक्यातील फोपरडे गावातील भसरे नामक व्यक्तीस ३० ते ३५ किलो वजनाचे ३ कट्टे गहूधान्य पेठ आगाराचे पेठ एकदरे बसमध्ये टाकत असतांना परिसरातील गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुरवठा अधिकाºयांच्या ही बाब लक्षात आणून दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, एकदरे पैकी हेदपाडा येथे बसमधून धान्य काळया बाजारात विक्र ीसाठी नेण्यात येत असल्याचे एकदरे गावचे उपसरपंच निवत्ती सापटे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोटंबी येथे सदरचे धान्य अडवले व पेठच्या पुरवठा निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी या तक्र ारीवरुन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर सदरचा धान्यसाठा शासकीय गोदामात जमा करण्यात आला. य्ाा पंचनामावर सरपंच सरपंच तुकाराम हिरामण सापटे यांचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे. अल्पदरात मिळणारे रेशनिंग प्रत्यक्षात ग्राहकांना देण्याऐवजी खुल्या बाजारात दामदुपटीने विकण्याचा गोरखधंदा राजरोस सुरू असुन त्यास प्रशासनाची साथ मिळत असल्याने तक्र ारी वाढविण्यापेक्षा असे प्रकार दडपून टाकण्याचा प्रकार होत असल्याने नागरीक या तक्र ारी करण्यास धजावत नसल्याचे दिसुन येते. सदरच्या दुकानातून अपूर्ण धान्य तसेच गेल्या ४ महिन्यापासुन रॉकेल मिळत नसल्याच्या तक्र ारी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आल्या आहेत. त्यावरही कारवाई झालेली नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची खुली चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. याबाबत नायब तहसीलदार नवले यांना निवेदन देण्यात आले आहे.
रेशनच्या धान्याची तस्करी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 5:13 PM
पेठ : तालुक्यातील एकदरे येथील रेशन दुकानातुन दिंडोरी तालुक्यातील फोपरडे गावातील भसरे नामक व्यक्तीस ३० ते ३५ किलो वजनाचे ३ कट्टे गहूधान्य पेठ आगाराचे पेठ एकदरे बसमध्ये टाकत असतांना परिसरातील गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुरवठा अधिकाºयांच्या ही बाब लक्षात आणून दिली.
ठळक मुद्देपेठ : पंचनामा करून मुद्देमाल गोदामात जमा