देवळा : देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी काम पाहिले.स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष ज्योत्स्ना संजय आहेर यांची अविरोध निवड झाली. मंगळवारी (दि.२१) देवळा नगरपंचायत सभागृहात विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या.यावेळी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी ज्योत्स्ना आहेर, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदासाठी अतुल अशोक पवार, नियोजन आणि विकास समिती सभापतीसाठी सुनंदा आहेर, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापतीपदासाठी केदा वाघ, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी वृषाली आहेर, स्वच्छता विषयक वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापती पदासाठी ललिता भामरे यांचे निर्धारित वेळात एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी शेजुळ यांनी सर्वांची बिनविरोध निवड केली असल्याचे जाहीर केले.नवनिर्वाचित सभापतींचा नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक आहेर, बाळासाहेब आहेर, शीला आहेर, प्रदीप आहेर, रोशन अलिटकर, मनिषा गुजरे आदी नगरसेवक उपस्थित होते(फोटो : २२ आहेर, २२ पवार)
देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:27 PM
देवळा : देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी काम पाहिले.
ठळक मुद्दे देवळा नगरपंचायत सभागृहात विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या.