मालेगाव : मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडिंग कंपनीने कांदा खरेदी नंतर शेतकºयांना धनादेश दिले होते; मात्र शेतकºयांना वेळेवर पैसा अदा केला जात नसल्यामुळे शुक्रवारी व्यापारी व शेतकºयांमध्ये काही काळ गोंधळ झाला होता. बाजार समितीचे सचिव अशोक देसले, सुनील अहिरे यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला. शुक्रवारी साडेदहा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना टप्प्याटप्प्याने पैसे अदा केले जाणार आहे.
धनादेश वटण्यावरून शेतकरी-व्यापाºयात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:01 PM