नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या व सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर-सायखेडा या रस्त्यावरील निसर्गसंपन्न नायगाव घाट परिसर सध्या विविध प्रकारच्या कचऱ्यांचा डेपो बनला आहे. त्यामुळे घाटाच्या सौंदर्याला विद्रुपीकरणाची बाधा पोहोचत आहे.नागमोडी वळणांच्या घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी, अनेक पोल्ट्रीधारक तसेच इतरही काही समाजकंटक कचरा टाकत आहेत. वारंवार विविध प्रकारच्या कचºयाचे ढीग रस्त्याच्या कडेला टाकून घाटाच्या सौंदर्यास बाधा पोहोचवत आहेत. डोंगराच्या कुशीतून जाणाºया या दोन किलोमीटर अंतराच्या नागमोडी वळणांच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी फुललेला निसर्ग प्रवाशांचा सेल्फी पॉइंट बनला आहे. अशा ठिकाणी विविध प्रकारचा ओला व सुका कचरा टाकून या निसर्गसौंदर्य तसेच प्रवाशांच्या आरोग्याशीखेळणाºया समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह निसर्गप्रेमींनी केली आहे.घाट परिसरात टाकल्या जाणाºया ओल्या कचºयाची दुर्गंधी तसेच वाळलेला कचरा पेटवून देत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाºया प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात विशेषत: पावसाळा व हिवाळा या ऋतूत पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु, या वाढत्या कचºयामुळे पर्यावरणही धोक्यात आले आहे.--------------------------------नायगाव खोºयात प्रवेश करताना घाटातील प्रवास मन प्रसन्न करत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधीमुळे नाक दाबून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.- राजेंद्र काकड, सामाजिक कार्यकर्ते, नायगावनिसर्गाचे वरदान लाभलेला नायगाव घाट परिसर कचºयाच्या ढिगाºयांनी गुदमरून गेला आहे. प्रत्येक वळणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाटाचे सौंदर्य टिकविण्यासाठी संबंधित विभागाने कचरा टाकणाºयांवर कारवाई करून घाटातील निसर्गसौंदर्य वाचविण्याची गरज आहे.- अजित गिते, निसर्गप्रेमी, ब्राह्मणवाडे
नायगाव घाटाच्या सौंदर्याला बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:34 PM