बैठकीचे आयोजन तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास मोरे यांनी केले होते. पक्षसंघटना मजबूत करणे, आगामी निवडणुका, प्रांताध्यक्ष ना.जयंत पाटील यांचा दौरा आदी विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, वामन खोसकर, समता परिषदेचे भिकुशेठ बत्तासे, योगेश देवरगावकर, युवक विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विधानसभा महिला अध्यक्ष भारतीताई भोये, मीराताई लहांगे, मुख्तार शेख, शहराध्यक्ष मनोज काण्णव, युवक शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, मारुती पवार, भारतीताई खिरारी, चंदर कामडी, अरुण बोरसे आदिनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, इगतपुरी विधानसभेची जागा ही काँग्रेसला सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य हिरामण खोसकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली. ते लढले व निवडून आले, परंतु मुलगी सासरी गेल्यासारखी गत आमदार हिरामण खोसकर यांची झाली आहे. तशी गत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत व्हायला नको, म्हणून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, असा सूर बैठकीत निघाला. बैठकीला भास्कर मेढे संतोष पाटील, अब्दुल मन्सुरी, केरू आहेर, राहुल जाधव, हेमंत काळे, शांताराम झोले, हरीभाऊ चव्हाण, अंकुश बोडके, कैलास मोरे, गणेश मोरे, अरुण महाले, शंकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
इन्फो
नेत्यांना कानपिचक्या
तालुक्यांतील ठरावीक राष्ट्रवादीचे नेते बॅनर, तसेच आमदारांच्या अवतीभोवती राहून पक्ष दावणीला असल्यासारखे वागत असतील, तर याची वरिष्ठ पातळींवर दखल घेतली जाईल, असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. युवक कार्यकर्ता हा फक्त काम करत राहतो. त्याला सत्तेत न्याय मिळणे अपेक्षित आहे. पक्षप्रमुख एकटेच माइक घेऊन गावोगावी फिरत असतील, तर कार्यकर्ता नाराज होतो. तो त्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो, मग आमच्या सारख्याला निरुत्तर व्हावे लागते, असे युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे यांनी परखड भाषेत मत व्यक्त केले.