शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

कार्यकारी संचालक पदमुक्तीवरून संचालकांमध्येच वादंग?

By admin | Published: April 01, 2016 11:13 PM

जिल्हा बॅँक : आज महत्त्वाची बैठक

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकांना हटविण्यावरून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात वादंग निर्माण झाले असून, शनिवारी (दि.२) होणाऱ्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, पदमुक्त कार्यकारी संचालकांनी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळातील उकटे काढण्याचा गर्भित इशारा दिल्याची चर्चा जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात असून, शनिवारच्या बैठकीत पुन्हा मागील कार्यकारी संचालकांना नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या नियुक्तीबाबत आलेल्या तक्रारींवरून तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा लेखापरीक्षक व धुळे जिल्हा उपनिबंधक यांच्या द्विसदस्यीय चौकशी समितीमार्फत देसले यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवालात देसले यांच्या नियुक्तीबाबत करण्यात आलेले आक्षेप पाहता काही दिवसांपूर्वीच जिल्हा बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी तडकाफडकी कार्यकारी संचालक सुभाष देसले यांना पदमुक्त करून त्यांच्या पदाची सूत्रे व्यवस्थापक यशवंत शिरसाट यांच्याकडे सोपविली होती. शनिवारी होणाऱ्या सर्व संचालकांच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा करण्याचे विषय पत्रिकेत नमूद करण्यात आले. त्यामुळेच कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या गच्छंतीवरून आणि प्रभारी कार्यकारी संचालकपदी यशवंत शिरसाट यांच्या नियुक्तीवरून सध्या संचालकांमध्ये गट-तट पडल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)