गोळे काॅलनीत वाहनांची कोंडी
नाशिक : गोळे कॉलनी येथील अरुंद रस्त्यावर मालवाहू वाहने आणली जात असल्याने अंतर्गत रस्त्यावर कोंडीची समस्या निर्माण होते. या ठिकाणी असलेल्या वितरकांकडे माल घेऊन येणाऱ्या वाहनांना वळण घेण्यात जागा नसल्याने त्यांना तेथून वाहन काढणेही कठीण होते.
वीजबिल भरण्यासाठी पुन्हा सक्ती
नाशिक : गेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या वीजबिलांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महावितरणने आता पुन्हा सक्तीची वसुली मोहीम सुरू केली असल्याने ग्राहकांना वीजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे.
भाजीपाल्याची आवक घटली
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. निर्बंधामुळे शहरात येणारी माहलवाहतूक काही प्रमाणात थांबली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.
अेाझरचा खडतर प्रवास थांबला
नाशिक : जिल्ह्यासाठी विमान प्रवासाची सोय झाल्याने आता रस्ते मार्गही त्यामुळे प्रशस्त झाला आहे. विमानतळापासून नाशिक शहरात येण्यासाठी प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत होता. आता हा मार्ग प्रशस्त करण्यात आल्याने प्रवासही सुखरूप झाला आहे.
विक्रेत्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
नाशिक: काेरोना संसर्गाचा धोका कायम असतानाही रस्त्यावरील तसेच मिठाई विक्रेत्यांकडील कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. हॅण्डग्लोज तसेच मास्कचा पुरेसा वापर केला जात नाही. अनेक कर्मचारी विनाग्लोज खाद्यपदार्थ तयारी करीत असतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.