मालेगाव : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोपआझादनगर : महागठबंधनच्या पंचायतच्या उत्तरादाखल काँग्रेस पक्षाकडून नयापुरा काबुल चौक येथे रात्री ‘अवामी अदालत’ घेऊन महागठबंधनचे गटनेते बुलंद एकबाल व माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल शहर विकासाला खोडा घालीत असल्याचा आरोप पक्ष प्रवक्ता साबीर गौहर यांनी केला.महापौर रशीद शेख यांच्या प्रभाग २० मध्ये ३७ कामे कागदोपत्री दर्शवित मनपास देयके सादर करण्यात आले असल्याचा मुद्दा उपस्थित करीत महागठबंधनकडून शहरात विविध भागात पंचायत बसवून जनजागृती करण्यात येत आहे. याच्या प्रतिउत्तरादाखल काँगे्रसनेही कंबर कसली असून, शुक्रवारपासून अवामी अदालतचे आयोजन करण्यात येत आहे.यावेळी साबीर गौहर, हाफीज अनिस अझहर, माजी नगरसेवक हाजी खालीद शेख, मोहंमद सलीम मेडिकलवाला यांनी महागठबंधन आघाडीवर टीका केली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
महागठबंधन आघाडीकडून शहर विकासाला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 11:31 PM
मालेगाव : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोपआझादनगर : महागठबंधनच्या पंचायतच्या उत्तरादाखल काँग्रेस पक्षाकडून नयापुरा काबुल चौक येथे रात्री ‘अवामी अदालत’ घेऊन महागठबंधनचे गटनेते बुलंद एकबाल व माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल शहर विकासाला खोडा घालीत असल्याचा आरोप पक्ष प्रवक्ता साबीर गौहर यांनी केला.
ठळक मुद्देआमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल शहर विकासाला खोडा घालीत असल्याचा आरोप पक्ष प्रवक्ता साबीर गौहर यांनी केला