जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात सकाळी सर्व कर्मचारी एकत्र येत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना हरित शपथ दिली. यावेळी क्षीरसागर यांनी येत्या वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले, तर बनसोड यांनी मार्गदर्शन करताना, माझी वसुंधरा हे अभियान प्रत्येकाशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने या अभियानात सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावे, कार्यालयात येताना सायकलचा वापर करावा, घरी बायोगॅस संयंत्राचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका उज्ज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे(आस्थापना), रवींद्र परदेशी, दीपक चाटे, महेश बच्छाव, डॉ.कपिल आहेर, मंगेश खैरनार, इवद १ दादाजी गांगुर्डे, सुनंदा नरवाडे, रमेश शिंदे यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जि. प. कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक हरित शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:16 AM