शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जि. प. शाळांमधील मुलींच्या घरांवर लावणार नावाच्या पाट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:17 AM

नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ...

ठळक मुद्देशिक्षण विभाग : स्रीभ्रूण हत्या, स्री शिक्षणाचा गजर; २६ पर्यंत मुदत

नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत सुमारे सव्वा लाखाहून अधिक मुलींच्या नावाच्या पाट्या येत्या २६ जानेवारीपर्यंत लावण्यात येणार आहेत.‘लेकीचे नाव दारावर, स्री सन्मानाचा करूया जागर’ असे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात येवला तालुक्यातील महालखेडा या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून करण्यात आली आहे. स्रीभ्रूण हत्या, अन्याय अत्याचार, हुंडाबळी, मुला-मुलींमध्ये केला जाणार भेद, मुलींच्या हक्काच्या शिक्षणातून होणारी गळती, अशा मानवनिर्मित संकटातून लेक चोहोंबाजूंनी वेढली गेल्याने ते थांबविण्यासाठी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ तर तिची या साºया गोष्टींतून मुक्तता होणार असल्याचे हेरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ३२७९ शाळांमध्ये शिक्षण घेणाºया १,३५,८३१ विद्यार्थिनींच्या घरांवर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता व शाळेचे नाव लिहिलेली रंगीत पाटी लावण्यात येणार आहे. ही पाटी लावण्यामागे मुलींमध्ये कुटुंबाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे हादेखील प्रमुख हेतू असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सदरचा उपक्रम पूर्ण करावयाचा असल्याने २५ डिसेंबरपासून सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या असल्या तरी, मुलींची संख्या पाहता, सदरचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणाºया या उपक्रमाने मुलींच्या शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी नक्कीच मदत होईल. मुलींच्या जन्माचे स्वागत, सन्मान करणाºया या उपक्रमांमुळे मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मदत होईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षकांनी परिश्रम घ्यायला हवेत.- डॉ. वैशाली वीर-झनकर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळा