समुहाने राहणे पसंत करणारा तरस हा वन्यप्राणी तसा दुर्मिळ आहे; मात्र जिल्ह्यात मागील पाच वर्षांत तो बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असल्याचे वन विभाग आणि वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत तरसाची तीन पिल्ले मंगळवारी (दि.१५) बेवारसस्थितीत शेतकऱ्यांना नजरेस पडली होती. याबाबतची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी कळविली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक पिल्लू मृतावस्थेत तर दोघे पिल्ले जिवंत असल्याचे लक्षात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या पिल्लाचा मृत्यू भुकेने झाल्याचे निदान केले.
--इन्फो--
उंटवाडीच्या वनविश्रामगृहात देखभाल
उपाशीपोटी राहिल्याने दोन्ही पिल्लांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इको-एको फाउण्डेशन आणि पुण्याच्या द ग्रासलॅन्ड ट्रस्ट या संस्थांच्या स्वयंसेवक उंटवाडी येथील वनविश्रामगृहातील एका खोलीत पिल्लांना निगा राखत होते. डोळेसुद्धा न उघडलेल्या या पिल्लांना उबदार वातावरणासह शास्त्रीय पद्धतीने शरीराच्या तापमानाएवढेच कोमट खाद्य दिले जात होते. संध्याकाळ हाेताच पिल्लांना सुरक्षितरीत्या वनकर्मचारी व वन्यजीवप्रेमी पुन्हा सिन्नरच्या घटनास्थळी घेऊन जात होते.
--इन्फो---
पदरी निराशा मात्र जिद्द कायम !
पिल्लांची त्यांच्या आईसोबत भेट घडविण्याचे सातत्याने प्रयत्न सुरूहोते. मात्र त्यामध्ये फारसे यश येत नव्हते. घटनास्थळापासून मादी दूर अंतरापर्यंत निघून गेल्याने ती येण्यास उशीर होत होता. वनविभागाचे कर्मचारी आणि वन्यजीवप्रेमी कॅमेऱ्यांद्वारे रात्री पिल्लांवर नजर ठेवून मादीची तासनतास प्रतीक्षा करत होते; मात्र सलग चार ते पाच दिवस पदरी निराशाच येत होती तरीही जिद्द सोडली नाही आणि मुक्या जिवांची ताटातूट रोखण्यास यश आल्याचे मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी सांगितले.
--इन्फो--
मातेचे मन रहावले नाही....!
तरसाच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवले गेले. पावसामुळे पिल्लांजवळ मादी फिरकत नव्हती. पावसाने उघडीप दिल्यानंतर मातृत्वाच्या मायेने मादी आपल्या पोटच्या गोळ्यांना धुंडाळत सोमवारी (दि.२१) चांदण्या रात्री त्यांच्याजवळ पोहचली अन् वनकर्मचारी, वन्यजीवप्रेमींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अवघ्या काही मिनिटांत तिने दोन्ही पिल्लांना एकापाठोपाठ तोंडात धरून सुरक्षित अधिवास गाठला.
===Photopath===
240621\24nsk_60_24062021_13.jpg~240621\24nsk_61_24062021_13.jpg
===Caption===
तरसाची पिल्ले~तरसाची पिल्ले