लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या पुढाकाराने श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गरीबांसाठी अन्न वाटप करण्यात येत आहे. या संस्थांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन दररोज दोन हजार पेक्षा अधिक पॅकेटचे दररोज वाटप केले जात आहे.करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये हाताला कामच नसल्याने प्रामुख्याने हातावर पोट असणारे कामगार व गरीब लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. गरीबांना या कालावधीत अन्न वाटप करण्यासाठी बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे अध्यक्ष स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पुढाकार घेतला असून ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तीपीठ संस्थान यांच्या माध्यमातून हे अन्न वाटप सुरू करण्यात आले आहे.संकटाच्या काळात गरीबांचे हाल होत आहेत. भुकेल्यांना अन्न हाच खरा धर्म आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक सामाजिक कार्यात आग्रेसर राहणार्?या श्रीराम शक्तीपीठाने भाविक भक्तांच्या सहकार्याने हे पुण्याचे काम हाती घेतले असून याची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार असल्याचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगीतले.या संस्थांच्या वतीने गेली आठवडाभरापासून चुंचाळे शिवारातील जवाहरलाल घरकुल योजना येथे ५०० पॅकेट, अंबड शिवारातील दोंदे मळा परिसरात ५०० पॅकेट, तसेच चुंचाळे शिवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी परिसरात ५०० पॅकेट व गरवारे पार्इंट परिसरातील झोपडपट्टीत ७५० अन्न पॅकेटांचे दररोज वाटप करण्यात येत आहे.यासह आदीवासी पाड्यांमध्ये रोजगार हिरावल्याने अनेक आदिवासी बांधांचे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे, बेझे,अंधारवाडी, गाजरवाडी या भागामध्ये धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच संस्थांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील अखाड्यांना भाजीपाला पुरवण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
गरजू,गरीबांना अन्नाची पाकीटे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 3:22 PM
त्र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या पुढाकाराने श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गरीबांसाठी अन्न वाटप करण्यात येत आहे. या संस्थांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन दररोज दोन हजार पेक्षा अधिक पॅकेटचे दररोज वाटप केले जात आहे.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : चुंचाळे झोपडपट्टी परिसरात २ हजार पॅकेटचे वाटप