लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्जवाटप व्हावे व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.मालेगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामासाठी शेतकºयांचे कर्जवाटप ठप्प आहे. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन त्वरित पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी तसेच राज्यात ठिकठिकाणी कर्जमाफी करा, पीककर्ज द्या, अशी मागणी करण्यात आली. राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. कर्जमाफी कागदावरच आहे आणि पीककर्ज मागणाºया शेतकºयांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे. शेतकºयांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दोन लाखांच्या वरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करू आणि नियमित कर्ज भरणाºयांना ५० हजार रु. प्रोत्साहनपर रक्कम देऊ असे जाहीर केले, मात्र अंमलबजावणी झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी देवा पाटील, नीलेश कचवे, लकी गिल उपस्थित होते.शेतकºयांवर आर्थिक संकटसिन्नर : ऐन खरीप हंगामात शेतकºयांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असून, शासनाने शेतकºयांना तत्काळ कर्जवाटप करावे, अशी मागणी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर बाळासाहेब हांडे, दत्तात्रय गोसावी, शहराध्यक्ष सोनल लहामगे, सुनील माळी, डॉ.दीपककुमार श्रीमाळी, सचिन गोळेसर, सजन सांगळे, हितेश वर्मा, सांगळे, छबू कांगणे, मंगेश परदेशी, सागर मूत्रक, चंद्रकला सोनवणे, प्रतिभा परदेशी आदींची नावे आहेत.
खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:55 PM
मालेगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्जवाटप व्हावे व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देभाजपची मागणी : मालेगाव, सिन्नर, पेठ तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन