साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीने स्वनिधीच्या पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.येथील प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उज्ज्वल सोळुंके हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बोराळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र थोरात, उपसरपंच राजेंद्र पवार, प्रवीण सोळुंके, वाल्मीक सोळुंके, अशोक मोरे, आप्पासाहेब महाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण २२० विद्यार्थ्यांना प्रत्येकी विषयानुसार वह्या व पाट्यांचे गावकऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच बोराळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र थोरात यांनी गेली सहा वर्षे ग्रामसेवक म्हणून केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सत्कारदेखील यावेळी करण्यात आला. प्राथमिक शाळेच्या उपशिक्षक अनिता देवराज यांच्या मुलाच्या वाढिदवसानिमित्त त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक स्वप्निल पाटील, उपशिक्षक पी. आर. सरावत, मुकुंद सूर्यवंशी, प्रदीप सोळुंके, स्वर्णसिंग सोळुंके, प्रवीण सोळुंके, अशोक मोरे, ज्ञानेश्वर निकम, सत्यवान पवार, कोमलसिंग सोळुंके, प्रताप महाले, आनंदसिंग ठोके, राजेंद्र सोनवणे, इंद्रसिंग सोळुंके, नाना सोळुंके, सुनील सोळुंके, नामदेव सोळुंके यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक विलास सोळुंके यांनी केले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 6:31 PM