कळवण : पोलीओमुक्ततेसाठी रोटरी क्लबचे कामकाज आणि कार्य अभिमानास्पद, कौतुकास्पद असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण ही समस्या वाढत असल्याने या प्रश्नासंदर्भात रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले. रोटरी क्लब आॅफ कळवण व इनरव्हील क्लब आॅफ कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कळवण शहर व तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रोटरीचे सहप्रांतपाल राजेंद्र भामरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष डॉ. पी. एच. कोठावदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, माजी उपप्रांतपाल विलास शिरारे, कळवण मर्चण्ट बॅँकेचे संचालक योगेश मालपुरे, राजेंद्र अमुतकार, गटशिक्षणाधिकारी ई . एन. पवार, डॉ. एस. बी. सोनवणे, सरचिटणीस निंबा पगार, प्रमिला जैन आदी उपास्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात येणारे पुरस्कारार्थींना भगवे फेटे बांधून सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी कळवण रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या वतीने देण्यात येत असलेले पुरस्कार हे कळवणसारख्या आदिवासी व खेडे-पाड्यातील कार्याचा उचित सन्मान असल्याचे सांगून कळवण रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष गालिब मिर्झा व इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी मालपुरे यांनी उपक्रमांची माहिती दिली. रोटरी क्लबचे सदस्य रवींद्र कुमावत व प्रशांत पगार यांची सद्गुरु गजानन पतसंस्थेच्या उपाध्यक्ष व जनसंपर्क संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी नीलेश भामरे, पी. एम. महाडिक, ज्योतिमाला देशमुख, निशिकांत बागुल, बापू पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विलास शिरारे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुचिता रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र कापडणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लबचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते.पुरस्कारार्थी शिक्षकइनरव्हील क्लबच्या वतीने नीलेश भामरे, ज्योतिमाला देशमुख, नितीन पाटील, तुषार पवार, जानकाबाई बागुल, योगेश अहिरे, राजेंद्र जाधव, बापू पवार, निर्मला देवरे, हेमंत सोनवणे, कल्पना पाटील, शैला कापडणीस, पांडुरंग महाडिक, लीना पाटील, सविता पवार, धनराज भोये, कैलास निकम तर रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने रमेश सोनवणे, भरत पाटील, संजय शिंदे, प्रा. किरण सूर्यवंशी, भास्कर बहिरम, भूषण सूर्यवंशी, महारू निकम, प्रा. एम. एम. शिरसाठ, निशिकांत बागुल, सुरेश येवला, अरु ण वाघ, निसार सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कळवणला आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:05 AM