ठळक मुद्दे राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रु ग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या महिलांना नवव्या महिन्यात पहिल्या प्रसुतीच्यावेळी अंगणवाडी सेविकेकडून या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. पहिल्या प्रसुतीवेळी
या बेबी केअर किट मध्ये नवजात शिशुचे कपडे,लंगोट,लहान मुलांची झोपण्याची गादी, टॉवेल,तापमान यंत्र,शिशुसाठी शरीराला लावण्यासाठी २५० मिली तेल,मच्छरदाणी,लहान चटई,खेळणी,लहान मुलांचा शाम्पू,नखे काढण्यासाठी नेल कटर,लहान मुलाच्या आईसाठी हात धुण्याचे लिकविड आणि साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग या सर्व उपयुक्त वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.आरोग्यासाठी हितकारक अशी ही योजना असल्याने लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी उपसरपंच संजय मोरे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुनील शेवाळे,माजी सरपंच गोकुळ मोरे, प्रवीण शेवाळे, मधुकर हिरे , रवींद्र शेवाळे, जिभाऊ नदाळे, अंगणवाडी सेविका सरला बच्छाव आदि उपस्थित होते.