रोटरी क्लब गोंदेश्वर सिन्नर यांच्याकडून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सायकलचे व खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थी आपल्या घरापासून एक ते दीड किलोमीटर पायी प्रवास करून शाळेत येतात. एका विद्यार्थ्याला पायाने चालणेच शक्य नव्हते तर दोघे पायाने अधू असले तरी इतरांप्रमाणे सायकल चालविणे शक्य आहे ही बाब हेरून मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी याबाबत आवाहन केले होते. त्यास रोटरी क्लब गोंदेश्वरने प्रतिसाद देत एक तीन चाकी सायकल व तीन साध्या सायकलींचे वाटप केले. ठाणगाव येथील दिव्यांग प्राथमिक शिक्षक पांडुरंग भोर यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा सत्कार रोटरी क्लब गोंदेश्वर सिन्नरचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांच्या हस्ते करून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी विद्यालयात रनिंग, संगीत खुर्ची, स्लो सायकल, पोत्याची शर्यत या आनंददायी स्पर्धा घेऊन बक्षिसे देण्यात आली. दिव्यांग विद्यार्थी कृष्णा पाटोळे, सुशिल शिंदे, रोशन आव्हाड, ओम रेवगडे, आदित्य रेवगडे, योगेश मेंगाळ, तुषार शिंदे, आदित्य आव्हाड, दीक्षा राऊत, कावेरी पालवे, सुप्रिया जाधव, पायल जाधव, माधुरी पाटोळे, रेश्मा आगिवले, प्रियंका जाधव, सारिका सदगीर, अमित दराडे, महेश बोºहाडे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पाडळी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 5:02 PM