नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वाडिवºहे पोलिसांनी दारणा धरणावरील आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने ब्रिटिशकालीन दारणा धरणावर रोजंदारीवर काम करणा-या आदिवासी बांधवांकडे होते नव्हते ते पैसेदेखील संपले. आजपर्यंत साठवून ठेवलेले धान्यही संपल्याने त्यांची उपासमार होत आहे. याच पार्श्वभूमीवर एक हात मदतीचा व सामाजिक बांधिलकी या नात्याने वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजीत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आदीवासी पाड्यावरील गरीब कुटुंबातील मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक राजू कचरे, पोलिस हवालदार प्रवीण मोरे,माणिक देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बोराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दारणा धरणावरील आदिवासी बांधवांना बिस्किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:40 PM
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वाडिवºहे पोलिसांनी दारणा धरणावरील आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
ठळक मुद्देवाडिव-हे पोलीस : संचारबंदीमुळे जपली बांधिलकी