सटाणा : तहसील कचेरीत हेलपाटे मारूनही जातीचे दाखले न मिळाल्याने नाउमेद झालेल्या बागलाण तालुक्यातील टिंगरी या आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांना महात्मा गांधी आण िपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सप्ताहच्या समारोपाचे औचित्य साधून एकाच दिवशी दोनशे जणांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी हा अभिनव उपक्र म हाती घेतला आहे. सप्ताहाचा समारोप प्रसंगी टिंगरी या आदिवासी पाड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जातीच्या दाखल्याच्या वितरणाचा कार्यक्र म आयोजित केला होता . प्रमुख पाहुणे म्हणून धर्मजागरण समितीचे जिल्हा प्रमुख प्रदीप बच्छाव, बागलाणचे प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब सावंत, मंडळ अधिकारी खरे ,अहिरे,माजी पंचायत समिती सदस्य अभिमन ठाकरे ,सचिन हिरे आदी उपस्थित होते. यावेळी दाखले वितरणानंतर आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.फोटो - ०२ सटाणा आदिवासीटिंगरी येथील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप प्रसंगी आमदार दिलीप बोरसे, प्रदीप बच्छाव ,प्रांत विजयकुमार भांगरे ,तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील आदी.