नाशिक - स्थानिक नागरिकांना व जवळपासच्या गावांमधूील नागरिकांना एका जागेवर व कमी श्रमात, कमी खर्चात सर्व शासकीय दाखले व योजनांचा मिळण्यासाठी गंगापुर येथे शासनाच्या महाराजस्व अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सीमा हिरे, नगरसेवक तथा शिवसेना गट नेते विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना अनेक प्रकारचे दाखले व रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. गंगापूर व परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी असलेल्या महाराजस्व अभियानाला गंगापूर व आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येऊन आपल्या कामांची पूर्तता केली. गंगापूर, गोवर्धन, चांदशी, दरी, मातोरी, जलालपूर, गंगाव्हरे, सावरगाव, आनंदवल्ली आदी गावातील नागरिक कार्यक्र माला उपस्थित होते. यावेळी नागरिकांचे तयार असलेल्या रेशनकार्ड व दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच शासकीय योजनेतील लाभार्थी यांना साहाय्य चेकचे वाटप मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी येथे महसूल, तलाठी, आधारकार्ड, सामाजिक संस्था, आरोग्य,अंगणवाडी, पुरवठा विभाग,भूमी अभिलेख,एसटी विभाग आदी शासकीय विभागाचे कक्ष येथे स्थापित करण्यात आले होते. प्रत्येक विभागाची नागरिकांना योग्य माहिती मिळावी, अभियानात त्यांना दाखला,योजना,आधारकार्ड,रेशनकार्ड व यातील दुरु स्त्या, माहिती गावपातळीवर होण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार अनिल दौंडे, कृषी अधिकारी वाघ, मंडळ अधिकारी आर. काळे आदी उपस्थित होते.