कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. याही परिस्थितीला तोंड देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का हा वाढलेला आहे. बिकट परिस्थितीला तोंड देत मुले ‘अधिकारी व्हायचं’ हे स्वप्न उराशी बाळगून शहरांमध्ये येऊन अभ्यास करताना दिसतात. परंतु स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना पेलवत नाही. सोमज येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र कुंदे यांच्या ही बाब लक्षात येताच ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांनी गावातील तरुण विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण, पोलीस भरती मार्गदर्शक, लुसेंट सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, फास्ट्रेक गणित, मेगा सामान्य ज्ञान, अभ्यास पेपर सेट, तात्यांचा ठोकळा, पेपर गाईड, सामान्य ज्ञान नोबेल, लक्षवेध, चालू घडामोडी अशी अनेक महत्त्वाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके मोफत वाटून सामाजिक भान जपले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी अवाढव्य खर्चास सामोरे जाताना त्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून सामाजिक बांधिलकीतून सरपंच कुंदे यांनी ग्रामपंचायतीमार्फत मोफत स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप करीत एक आदर्श निर्माण केला असून, या आदर्शवत उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
याप्रसंगी सरपंच मच्छिंद्र कुंदे, उपसरपंच गोरखनाथ भाकरे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती वसावे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील तरुण मुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- १८ सोमज
सोमज येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करताना सरपंच मच्छिंद्र कुंदे. समवेत ग्रामविकास अधिकारी श्रीमती वसावे व विद्यार्थी.
180821\18nsk_16_18082021_13.jpg
फोटो- १८ सोमज