नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचलित सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले.
नाशिक येथील निरामय रुग्णालय यांनी सामाजिक बांधिलकीतून हे साहित्य संस्थेला भेट दिले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला संचालक सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, कोरोना योद्धे पंचवटी पोलीस स्थानकाचे संदीप शेळके, किरण सानप, प्राचार्य बी. आर. खैरनार, डॉ. मारुती घुगे, डॉ. हेमंत साबळे, पर्यवेक्षक एच. ए. मणियार, संजय विलग आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसात सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन यावेळी डॉ. हेमंत साबळे यांनी केले. डॉ. घुगे यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. घुगे व साबळे याच्यांतर्फे विद्यालयाला कोरोना प्रतिबंधक साहित्य मोफत देण्यात आले. सॅनिटायझर, थर्मामीटर, आॅक्सिमीटर आदी साहित्य प्राचार्य खैरनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिलीप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. एन. सांगळे यांनी आभार मानले.
फोटो- १७ नांदूरशिंगोटे
कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, संदीप शेळके, किरण सानप, बी. आर. खैरनार, मारूती घुगे, हेमंत साबळे, एच. ए. मणियार, संजय विलग आदी उपस्थित होते.
===Photopath===
170221\17nsk_8_17022021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ नांदूरशिंगोटे कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले. सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, संदीप शेळके, किरण सानप, बी. आर. खैरनार, मारूती घुगे, हेमंत साबळे, एच. ए. मणियार, संजय विलग आदी.