पांगरी : येथील ग्रामविकास मंचतर्फे आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, या कठीण प्रसंगी भोकणी गावात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ग्रामविकास मंचच्यावतीने कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज्, हँडवाॅश, नोंदणी वही आदीचा समावेश आहे.
यावेळी सरपंच अरुण वाघ, ग्रामसेवक एम. एम. मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी भागिनाथ कुऱ्हाडे, दीपक मोरे आशा सेविका आरती ओहोळ, पद्मा सांगळे, अंगणवाडी सेविका सविता कुऱ्हाडे, मीनाक्षी साबळे, आशा कुऱ्हाडे, शकुंतला गोसावी, सुमन कुऱ्हाडे, ग्रामविकास मंचचे सदस्य शांताराम कुऱ्हाडे, संपत ओहळ, रितेश मलानी, शरद साबळे, सोमनाथ कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- ०५ भोकणी किट
भोकणी येथील ग्रामविकास मंचतर्फे आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ, ग्रामसेवक एम. एम. मोरे, भागिनाथ कुऱ्हाडे, दीपक मोरे, आरती ओहोळ, पद्मा सांगळे, सविता कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
===Photopath===
050521\05nsk_16_05052021_13.jpg
===Caption===
भोकणी येथील ग्रामविकास मंचतर्फे आशासेविका, अंगणवाडीसेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी सरपंच अरुण वाघ, ग्रामसेवक एम एम मोरे, भागिनाथ कुऱ्हाडे, दीपक मोरे, आरती ओहोळ, पद्मा सांगळे, सविता कुऱ्हाडे आदी.