नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका कृषी विभागाकडून बेलगाव तºहाळे येथे विविध उपक्रमांनी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी पीक विमा नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शेतकरी बांधवांना भात लागवडीसाठी नवीन यांत्रिकीकरणाची माहिती, कृषीपीक विमा, अपघात विमा योजना, पीएम किसान योजना, चार सूत्री पद्धत, युरिया ब्रिकेट वापर, खत वापर मात्रा, अनुदानित यांत्रिक औजारे, फळबाग लागवड, भाजीपाला पीक, विक्री, शेतकरी बचत गट, नवनवीन पीक पद्धती, लागवड, खत, हवामान बदल, ठिबक सिंचन, पशुपालन योजना याबाबत पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर पिक विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन व्यावसायिक दृष्टीने शेती करावी यासाठी शेतीच्या बांधापर्यंत शासनाच्या विविध योजना, माहिती, मार्गदर्शन, यांचे नियोजन करून कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून इगतपुरी तालुका कृषी विभाग प्रयत्न करीत असल्याचे तंवर यांनी सांगितले.
पीक विमा नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:57 PM