शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

मोहदरी जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग कीट व खेळ साहित्य वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 6:18 PM

सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेतून मोहदरी येथील जिल्हा परिषद शाळेस संगणक संच, साऊंड सिस्टिम, प्रथमोपचार पेटी, खेळ साहित्य, पूरक अध्ययन खेळ साहित्य देण्यात आले. तसेच अंगणवाडीस प्रथमोपचार पेटी, खेळाचे साहित्य ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम बोडके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त लोकसहभाग देण्यासाठी केंद्र प्रमुख संदीप गिते यांनी प्रेरित केले. साहित्याचा उपयोग विद्यार्थी घडविण्यासाठी, आनंददायी शिक्षण होण्यासाठी व्हावा असेही गिते यांनी सांगितले. माजी सरपंच कैलास बिन्नर यांनी स्वच्छता, शिक्षण व आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील सर्व गरजा भागविण्यसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढेही अशीच मदत विद्यार्थी हितासाठी करणार असल्याचे आश्वासन सरपंच बोडके यांनी दिले. यावेळी उपसरपंच साहेबराव बिन्नर, शालेय समितीचे अध्यक्ष लहानू करवर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव भिसे, संदीप बोडके, अंबादास सदगीर, सोमनाथ बोडके, संजय ढोन्नर, वाळिबा सदगीर, शांताराम बिन्नर, योगेश बिन्नर, ग्रामविकास अधिकारी संतोष बुचडे आदींसह पालक समितीचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. साधना सानप यांनी सूत्रसंचालन केले. अरूण बिन्नर यांनी आभार मानले. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा