इगतपुरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील चिंचले खैरे जिल्हा परिषद शाळेत मुबंई येथील पारिजात फाऊंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी परिजात फाऊंडेशनचे सदस्य तुषार कोठारी ,कौर ,शिरोडकर , सरपंच मंगाजी भाऊ खडके ,सदस्य भाऊ भुरबुडे माजी उपसरपंच निवृत्ती खोडके ,गोविंद तळपाडे ,संजय भोईर, शिक्षक नामदेव धादवड , प्रशांत बाबळे ,हौशीराम भगत,भाग्यश्री जोशी,मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.आदिवासी भागातील मुलांनी शिक्षणा पासुन वंचित न राहाता उच्चशिक्षित व्हावे व गावा बरोबर देशाचे नाव लौकिक करावे हा पारजिात फाऊंडेशन संस्थेचा उद्देश आहे असे तुषार कोठारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
चिंचलेखैरेत शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:30 PM