बोंडारमाळ या अतिदुर्गम गावात आपली आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प.पू. स्वामी जयरामगिरी महाराज, आशा घाटे, इंदुबाई आडके, अरुण बेलदार, आदींच्या सामाजिक दातृत्वातून १०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, सुनंदा चौधरी, मनीषा काळे, कविता डावरे, दत्ता गुंजाळ हिरामण वातास, दगडू गाडर, गोविंद बोरसे, कमोद गाडर, काळू वातास, काशिनाथ वातास, मांवजी वातास, मंगळू वातास, किसन पेटार, जितू पेटार, चंदर गाडर, सोमनाथ वातास, शिवा पेटार, मधुकर बोरसे, अरुण बेलदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पेठ शहरातील धनलक्ष्मीचे संचालक सचिन गाडगीळ यांच्या माध्यमातून लव्हाळी, गायधोंड, हट्टीपाडा येथील मुलांना ऐन कोरोना कामात शैक्षणिक साहित्य प्राप्त झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व पालकांमध्ये समाधान दिसून आले.
कोरोनाच्या या कठीण काळातही आपल्या अखंड सेवेच्या व्रताची जाणीव ठेवून ‘अमास सेवा ग्रुपने’ पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या तालुक्यातील ५८ शाळांमधील ३५१४ विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अमास सेवा ग्रुप, मुंबईचे सदस्य चंद्रकांत, भगत, पंढरीनाथ वालवणे, हरिश्चंद्र भोये, ज्ञानेश्वर कोकणे, धनंजय भोये, ममता जाधव, आदी उपस्थित होते.
-------------------
बोंडारमाळ (ता. पेठ) येथे शालेय साहित्य वाटप प्रसंगी खंडेराव डावरे, आशा घाटे, इंदुबाई आडके, अरुण बेलदार, आदी उपस्थित होते. (१३ पेठ ४)
130821\13nsk_27_13082021_13.jpg
१३ पेठ ४