एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना कोविड काळामध्ये खावटी अनुदान योजनेंतर्गत आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खेलदरी आश्रमशाळेंतर्गत असलेल्या १७ गावांपैकी खेलदरी गावातील ६२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. यावेळी भूषण कासलीवाल यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी सरपंच नामदेव माळी, विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय कडाळे, नितीन फंगाळ, तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- १८ खावटी
चांदवड तालुक्यातील चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनुसूचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना भूषण कासलीवाल, वर्धमान पांडे, पी.व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदींसह लाभार्थी.
180821\18nsk_7_18082021_13.jpg
फोटो- १८ खावटी चांदवड तालुक्यातील चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनूसूचित कुंटूबांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करतांना भूषण कासलीवाल, वर्धमान पांडे, पी.व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदिसह लाभार्थी