सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर बियाणे व खत मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाई तीव्रता कमी करण्याकरिता वैरण बियाणे व खते वितरण ही योजना राबविण्यात येणार आहे. ३० आॅक्टोंबर ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती येथे अर्ज स्वीकरण्यात येणार आहे. पशुपालक व शेतकरी यांनी अर्जासोबत सातबारा उतारा व सिंचन क्षेत्र असल्याबाबतचा पुरावा, विहीर, शेततळे, बोरवेल अथवा कालवा असल्याचा पुरावा जोडण्यात यावा. या योजनेमध्ये पशुपालकांना किमान १० आर क्षेत्रामध्ये मका अफ्रिकन टॉल किंवा ज्वारी ही वैरणीचे पिके घेण्यासाठी प्रती १० गुंठ्याकरिता ४६० रूपये अनुदान आहे. त्यामधुन प्रत्यकी ५ किलो मका बियाणे किंवा ४ किलो ज्वारीची बियाणे खरेदी करून देण्यात येणार आहे. उर्वरीत रक्कम खते व इतर बाबीसाठी संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना संबंधित पशुवैदयकीय अधिकारी स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक पशुपालकांनी १२ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या गावातील पशुधन वैदयकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभाग यांनी केले केले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदानावर वैरण बियाणे व खतांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 6:31 PM
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर बियाणे व खत मिळणार आहे.
ठळक मुद्देइच्छुक पशुपालकांनी १२ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या गावातील पशुधन वैदयकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत,