पंचाळे येथील चैतन्य युवाशक्ती फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सचिव महेश थोरात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. गरीब, अनाथ, दिव्यांग, मूकबधिर शाळा, वसतिगृहात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रथमोेपचार औषधे आणि शक्य होईल तेव्हा मोफत आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून थोरात यांनी केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात शिंगवेचे ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर मोगल, सिग्नस मेडिकल पाथर्डी फाटा, ओम फार्मा निड्स, मुंबई नाका, नाशिक या मेडिकल संस्थांनी दहा हजार रूपयांपेक्षा जास्त किमतीची प्रथमोचार औषधे उपलब्ध करून दिली. जमा झालेली औषधे नाशिकच्या नि:स्वार्थ मूकबधिर दिव्यांग मुला-मुलींचे वसतिगृहाचे संचालक गोकूळसिंग घोरपडे यांच्याकडे थोरात यांनी सुपूर्द केली.
दिव्यांग-मूकबधिर वसतिगृहाला मोफत औषधांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 5:27 PM