नाशिक : संविधान प्रचारक चळवळीच्या माध्यमातून पे बॅक टू सोसायटी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून महाराष्ट्रातील विविध भागातील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले असून, नाशिकमधील गणेशगाव, त्र्यंबकेश्वर आदी आदिवासी परिसरात स्टेप फाउंडेशनच्या सहकार्याने अशा प्रकारची मदत पोहोचविण्यात आली. कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देत आदिवासी गावांतील ३४ गरजू कुटुंबाना दहा दिवस पुरेल, असे किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्टेप फाउंडेशन नाशिकचे अध्यक्ष व संविधान प्रचारक गोकुळ मेदगे, गणेशगावचे सरपंच गणपत ठमके, तुकाराम नामेडे, सुरेश नामेडे, भीमराव कोरडे, पोलीस पाटील दत्तू लिलके, एकनाथ नामेडे, पुंडलिक लिलके, ज्ञानेश्वर ठमके, समाधान लिलके, विश्वजित पाटील, रोशन मेदगे, निशू सिंग, आकाश काळे, गोपाळ माळी, सोमन्ना जत्ती, संतोष वाजे, संपत मेदगे, सतीश मेदगे, तुषार जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
वंचितांना किराणा मालाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 9:37 PM