येवला : भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात असून, या सेवा सप्ताहांतर्गत ५५ गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यता आले.
प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, गणेश शिंदे, मनोज दिवटे, अमोल शिंदे, राजू परदेशी, बापूसाहेब गाडेकर, राधेश्याम परदेशी, कुणाल क्षीरसागर, सुनील काटवे, प्रशांत शिणकर आदींच्या हस्ते सदर किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे मयूर मेघराज, नगरसेवक सस्कर शिंदे, परदेशी यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज दिवटे यांनी, तर आभार प्रदर्शन बापूसाहेब गाडेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललित वखारे, मयूर रुणवाल, श्रेयस चोरडिया, आयुष फणसे, हेमंत सांबर, वैष्णव पवार, रोहन कुक्कर आदींनी परिश्रम घेतले. (२६ वेवला बीजेपी)
260921\26nsk_31_26092021_13.jpg
येवल्यात गरजूंना किराणा किट वाटप