डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, वैशाली भदाणे, यशोदाबाई सोनवणे, पमाबाई सोनवणे, वत्सलाबाई पवार,रामदास पवार,ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी ग्रांमस्थ पंकज भदाणे पंढरीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने केळझर बीट २ मधील अंगणवाडीतील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा मातांना एक मुठ पोषण आहार योजनेर्तगत १ कि. शेंगदाणे, १ कि. गुळ, फुटाणे, अंडी, बटाटे, खोबरेल तेल आदी वस्तूंचे वाटप सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, सरपंच, उपसरपंच ग्रा. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्र मासाठी अंगणवाडी सेविका ज्योती उपासनी, संगिता बोरसे, मंगल सोनवणे, दिपाली बोरसे, रु पाली बिरारी, रंजना बैरागी, द्रौपदा सोनवणे आदी उपस्थित होते.
डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 3:27 PM
डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला.
ठळक मुद्दे शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप