---------------------------------------------
वस्तू प्रदर्शनाला प्रतिसाद
पेठ : डांग सेवा मंडळ संचलित, दादासाहेब बिडकर महाविद्यालयाच्या उद्योग केंद्रात महिलांनी तयार केलेल्या फाईल, लिफाफे, पेपर बॅग तसेच शारदा माहिला मंडळाच्यावतीने ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या सॅनिटरीन नॅपकीन व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने ग्रामीण व आदिवासी भागात घरगुती उद्योगांना चालना मिळेल, असे आयोजकांनी सांगितले.
--------------------------------------
बचत गट महिलांचे प्रशिक्षण
पेठ : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा व बायफ प्रकल्पांतर्गत जुनोठी व फणस पाडा येथील स्वयसहायता समूहातील महिलांचे एकदिवसीय प्रशिक्षण पेठ येथे पार पडले. सुरेश सहाणे यांनी महिलांना गटामार्फत उद्योग व्यवसाय कसा करावा, व्यवसाय कसा निवडावा, तसेच बचत गट कसे सुरळीत चालू ठेवावे, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रवीण ठोसर यांनी शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल व पेरू फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जुनोठी परिसरातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते.
--------------------------------------
ग्रामस्तरीय कार्यशाळा उत्साहात
पेठ : पेसा कायदयांतर्गत पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धोंडमाळ येथे ‘आमचा गाव आमचा विकास’अंतर्गत करावयाच्या आराखडयाबाबत ग्रामस्तरीय कार्यशाळा उत्साहात झाली. यावेळी धोंडमाळसह अंबापूर, खंबाळे, गढईपाडा, कापूरझिरा, जाधवपाडा, खडकाचापाडा आदी गावांमध्ये करावयाच्या विकास कामांचा आढावा व नियोजन तयार करण्यात आले. याप्रसंगी क्षेत्रीय आधिकारी प्रशांत जाधव, सरपंच जयवंती वाघमारे, उपसरंपच रामजी वड, नामदेव बोके, दिलीप शेवरे, ग्रामसेवक भूषण लोहार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.