श्री साई सहाय्य समिती, इगतपुरी व प्रभुनयन फाऊंडेशन, मुबंई यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तू व कपडे यांचे वाटप करण्यात आले. समितीने पंधरा दिवसांपूर्वी या पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप केले. मात्र, नदीला पूर आल्याने संपूर्ण चिपळूण शहर पुराच्या पाण्याने वेढले होते.
घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू वाहून गेल्याने येथील नागरिकांच्या मदतीसाठी इगतपुरी येथील साई सहाय्य समिती व प्रभू नयन फाऊंडेशनचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते योगेश चादवडकर, बबलू बिरजे, कृष्णा निकम, समाधान खातळे, आकाश शर्मा, गणपत खातळे हे मदतीसाठी धावून गेले. चिपळूण येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार, शामल अदटराव, मुक्ता पवार, सरिता पवार यांच्या मदतीने येथील पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदतीसाठी प्रभू नयन फाऊंडेशनचे अध्यक्ष
आनंद मावणी, साई सहाय्य समिती अध्यक्ष राजू देवळेकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, अनिकेत यादव, सुनील मते, शुभम काळे, राजेश त्रिभुवन, शुभम सहाणे यांचे सहकार्य लाभले.
--------------------
इगतपुरी शहरातून चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठीची मदत रवाना करताना योगेश चादवडकर, बबलू बिरजे, कृष्णा निकम, समाधान खातळे, आकाश शर्मा आदी. (०२ इगतपुरी २)
020921\02nsk_10_02092021_13.jpg
०२ इगतपुरी २