नाशिक : एकेकाळी शंभरी पार केलेल्या तूरडाळीचे वाढते महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या अमाप पिकामुळे यंदा तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली, परंतु उठावाअभावी पडून असलेली तूरडाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांनी रेशनमधून तूरडाळ विक्रीसाठी उत्सुकता दर्शविली असून, जून महिन्यासाठी ५५० क्विंटल डाळीची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी वर्षी राज्यात तूरडाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रुपये किलो दराने तूरडाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तूरडाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तूरडाळीने कधी नव्हे इतका भाव खाल्ल्याने सरकारने तूरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित तर केलेच, परंतु तुरीला मिळणारा भाव पाहून गेल्या वर्षी तुरीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली. परिणामी राज्यात बंपर पीक आले. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकºयांनी तूर कमी भावाने खरेदी करण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हमीभावाने म्हणजेच ५० रुपये ५० पैसे दराने तूर खरेदी केंद्रे सुरू केली. राज्यात सुमारे १६ लाख क्विंटल तूर हंगामात खरेदी करण्यात आली. त्यामानाने त्याचा उठाव होऊ शकला नाही. गेल्या चार महिन्यांत जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई होऊन ती रेशनमधून विक्री करण्यात आली. डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे प्रत्येकी एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु खुल्या बाजारात पॉलिश केलेली उत्तम प्रतिची तूरदाळ ६० ते ६५ रुपयांपर्यंत मिळत असताना रेशनमधील तूरडाळ घेण्यास ग्राहकांनी नाके मुरडली. त्यामुळे नंतर तिची मागणीच नोंदविली गेली नाही. आता मात्र राज्य सरकारवर तुरीचे संकट कोसळले असून, लाखो क्विंटल तुरीचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा रेशनमधूनच ग्राहकांना ती सक्तीने विक्री करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांना प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यांच्या कमिशनमध्ये घसघशीत ३ रुपये वाढ करण्यात आली आहे जेणे करून त्यांनी अधिक तूरडाळीची विक्री करावी.
जूनमध्ये वाटप : शासनाकडे लाखो क्विंटल डाळ पडून तूरडाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:38 AM
नाशिक : शंभरी पार केलेल्या तूरडाळीचे महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी अमाप पिकामुळे यंदा तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली, परंतु उठावाअभावी पडून असलेली तूरडाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसरकारने तूरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले चार महिन्यांत जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई