निफाड : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ मार्फत ५० टक्के अनुदानावर पिंप्री (रौळस ) येथील दहा पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे, विभागीय पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक डॉ बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे, सहाय्यक गट विकास अधिकारी सानप, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील अहिरे, पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पाटील आदी मान्यवर होते उपस्थित होते. सदर योजना राबवण्यासाठी विभागीय पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक डॉ बाबुराव नरवडे यांचे सहकार्य लाभले. दिलीप आहेर यांनी सूत्रसंचालन केले.
पिंप्री (रौळस) येथे कडबा कुट्टी यंत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 7:16 PM
निफाड : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ मार्फत ५० टक्के अनुदानावर पिंप्री (रौळस ) येथील दहा पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्दे वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.